maharashtra news latest shivraj maharaj

आर्टिकल्स महाराष्ट्र शिवाजी महाराज… किल्ले !

Spread the love

TEAVEE न्यूज़ चैनल (इंडिया)™ (मराठी भाषा में) : शिवनेरी किल्ला
महाराष्ट्राला स्वतंत्रपणे, अभिमानाने जगण्याची दिशा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तो हाच शिवनेरी किल्ला. म्हणूनच या किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. दक्षिणेला हडसर किल्ला, चावंड किल्ला तर वायव्येला जीवधन, नाणेघाट आहे. उत्तरेला लेण्यादीचा गणपती, तर पश्चिमेला भीमाशंकर आणि पूवेर्ला ओझरचा गणपती आहे. चारही दिशांनी शिवनेरीला गडकिल्ल्यांनी आणि पवित्र देवस्थानांनी वेढलं आहे. शिवनेरी किल्ला सुमारे १०७० मीटर उंच असून दक्षिण – उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती आहे, तर उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे.

प्राचीन कालखंडापासून शिवनेरी किल्ला विविध राजवटी खाली होता. जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठा प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ. स. १४४३ मध्ये मलिक उल तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ. स. १४७० मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ. स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला.

जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार. इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ.स. १६७८मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला असा इतिहास आहे.

गडावर जाण्यासाठी दोन प्रचलित वाटा आहे. त्यातील एक वाट म्हणजे जुना राजमार्ग. सध्या याच मार्गाने वाहनाने गडाच्या मध्यभागापर्यंत जाता येतं, दुसऱ्या साखळीच्या वाटेने गडावर जाण्यासाठी थोडी कसरत करावी लागते. त्यासाठी सोबत दोर आणि इतर प्रस्तरारोहणाचं साहित्य आवश्यक असतं. राजमार्गाने वर जाताना सात प्रशस्त दरवाजे लागतात. परवानगी दरवाजा, हत्ती दरवाजा, पीर दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलापकर दरवाजा अशी या दरवाजांची यादी आहे. या दरवाजांची बांधणी वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या राजवटींमध्ये झाली आहे. जसजसं वर जावं तसं चौथरे, पाण्याची टाकं, अष्टकोनी बुरूज अशा अनेक वास्तू नजरेस येतात. पीर दरवाजाशेजारी एक पीर आहे, तर पुढे येणाऱ्या शिपाई दरवाजातून उजवीकडे गेल्यावर शिवाई मंदिर येतं. मंदिराकडे जाताना दगडी बांधणीचा सुंदर दरवाजा आहे. याच शिवाई देवीला जिजाऊंनी साकडं घातलं होतं. याच देवीवरून बालकाचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. मंदिराच्या अलीकडे पाण्याची टाकं आहेत.

मंदिरानंतर वर गेल्यावर जागोजागी घातलेले तट, उभे कडे आणि प्रचंड संरक्षणात्मक बुरूज आहेत. थोडं वर गेल्यावर डाव्या हाताला अंबरखान्याची भव्य इमारत दिसते. अंबरखान्याच्या पुढे दगडात खोदलेल्या गंगा आणि यमुना अशी पाण्याची टाकं आहेत. गडावर अनेक पाण्याची टाकं आहेत. लढाईच्या काळात मुबलक पाण्याचा साठा आवश्यकच. आणखी पुढे राज्य सरकारने बांधलेलं शिवकुंज सभामंडळ दिसतं. या शिवकुंजात जिजाऊ आणि बालशिवाजी यांचं पंचधातूंचं शिल्प स्थापित केलं आहे. अखेर समोर दिसते शिवजन्मस्थानाची इमारत. पुढे प्रशस्त असा बदामी तलाव लक्ष वेधून घेतो. तलावाच्या मधोमध असणारा दगडी खांब

TEAVEE न्यूज़ चैनल (इंडिया)™

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: LEGAL action will be taken against you if you copy any content | TEA-VEE News is a TRADEMARK | LEGAL Dept. (Tea Vee News Channel)